अनेक कागदपत्रे हस्तगत, मनी लाँडरिंगचा आरोप
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मोबाईल हँडसेट निर्माण करणारी चीनी कंपनी व्हीव्हो अखेर तपास यंत्रणांच्या कचाटय़ात सापडली आहे. मंगळवारी या कंपनीच्या देशभरातील अनेक कार्यालयांवर आणि उत्पादन केंद्रांवर धाडी घालण्यात आल्या आहेत. मंगळवारी सकाळपासूनच या कंपनीच्या कार्यालयांवर धाडी घालण्याचे सत्र सुरु केले.
या धाडींमध्ये अनेक महत्वाची कागतपत्रे सापडल्याचे स्पष्ट करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत हे काम सुरु होते. व्हीव्हो कंपनीवर मनी लाँडरिंग केल्याचा आरोप करण्यात आला असून त्या संबंधात या धाडी होत्या. कंपनीने बेकायदेशीर रित्या भारतातून पैसा देशाबाहेर नेल्याचा आरोप आहे. तो सिद्ध करण्यासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करीत असल्यग्नाचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कंपनीच्या 44 कार्यालयांवर आणि उत्पादन केंद्रांवर या धाडी घालण्यात आल्या. कंपनीचे व्यवहार गेली अनेक वर्षे संशयास्पद असल्याचे दिसून येत होते. परिणामी या कंपनीवर तपास यंत्रणाचे लक्ष होते. या कंपनीच्या सहकंपन्या आणि उपकंपन्यांवरही छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी एका मोठय़ा चीनी कंपनीवर 5 हजार कोटी हून अधिक रुपयांचा दंड ठोठावला होता. ईडी आणि सीबीआय यांच्याकडून हा तपास सुरु आहे.
व्यवहार संशयास्पद भारतात अनेक चीनी कंपन्यांनी कार्यालये आणि उत्पादन केंद्रे आहेत. मात्र, त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर नेहमीच शंका घेतल्या गेल्या आहेत. उत्पादनाचा दर्जा, आणि आर्थिक नफाखोरी इत्यादी आरोप या कंपन्यांवर केले जातात.









