जनतेने सहकार्य करण्याचे ‘स्मार्ट सिटी’चे आवाहन : संजित रॉड्रिग्ज यांनी घेतली रायबंदरवासियांची बैठक
पणजी : पणजी शहरात ‘स्मार्ट सिटी’च्या कामांचा बोजवारा उडालेला असतानाच आता पणजी महापालिकेचा भाग असलेल्या रायबंदर येथे स्मार्ट सिटीची कामे सुरु करण्यात येत असून, त्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या कामांबाबत गोंधळ होऊ नये, असे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रायबंदर या ठिकाणी जर स्मार्ट सिटीच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली तर याचा त्रास फोंडा, माशेल, जुने गोवे, कुंभारजुवे येथील नागरिकांना होऊ शकतो. कारण रायबंदर हा भागच मुळात अऊंद रस्त्यांचा आहे. या ठिकाणी मलनिस्सारण वाहिनीसाठी खोदल्या जाणाऱ्या ख•dयांमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे या भागात कामे करताना ती वेळेत होण्याबरोबरच गोंधळाशिवाय पार पडावीत अशी लोकांची मागणी आहे.
रायबंदरवासियांची बैठक
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत हाती घेतलेल्या विठ्ठल मंदिर ते रायबंदर पाटो या पाच किलोमीटरच्या मलनिस्सारण वाहिनीचे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे 5 महिने लागतील, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्स यांनी दिली. त्यांनी काल गुऊवारी रायबंदर येथील लोकांसोबत बैठक घेऊन त्यांना प्रस्तावित कामाबद्दल आणि कामाशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबद्दल समजावून सांगितले आहे. लोकांची गैरसोय कमी होण्यासाठी प्रत्येक टप्प्यात एक किलोमीटर पाईपलाईनचे काम हाती घेण्यात येईल. प्रत्येक टप्पा पूर्ण होण्यासाठी किमान 30 दिवस लागतील, असेही त्यांनी सांगितले.
पणजीत दोन दिवसांत कामाला सुरुवात
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत 18 जूनच्या गजबजलेल्या रस्त्यावर मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम आणखी दोन दिवसांत हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही संजित रॉड्रिग्स यांनी दिली. पणजीमध्ये या कामासाठी वापरलेली पद्धत ही ट्रेंचलेस हॉरिझॉन्टल डायरेक्ट ड्रिलिंग (टीएचडीडी) आहे, यात पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्यावर खंदक खोदण्याची आवश्यकता नाही. 18 जून हा रस्ता फार्मसी कॉलेजपासून विभागानुसार बंद केला जाईल.









