उपाध्यक्षपदी राणी शिरसाट, कोषाध्यक्षपदी गुरूप्रसाद जाधव विजयी
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा महसूल कर्मचारी (क वर्गीय) संघटनेच्या शनिवारी अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी राहुल शिंदे, उपाध्यक्षपदी राणी शिरसाट, कोषाध्यक्षपदी गुरुप्रसाद जाधव विजयी झाले. संघटनेच्या 366 पैकी 302 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच कार्याध्यक्षपदी लखन खाडे, सरचिटणीसपदी अमित पाटील, सहकोषाध्यक्षपदी तेजपाल गोलगंडे, प्रवक्तेपदी प्रवीण माने,
वाहन चालक प्रतिनिधी म्हणून श्री अभिजीत भोसले, महिला प्रतिनिधीपदी सुजाता काजिरणेकर यांची बिनविरोध निवड झाली.
महसूल कर्मचारी संघटनेची 2023 ते 2027 या कालावधिसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु होती. सुरुवातीच्या टप्प्यात संघटनेकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व कोषाध्यक्षपदासाठी निवडणूक लागली. तर अन्य पदे बिनविरोध झाली.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी छत्रपती ताराराणी सभागृहात शनिवारी सकाळी 11.30 ते दुपारी 2.30 यावेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रवीण माने यांनी काम पाहिले. अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत 366 पैकी 302 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. 82 टक्के इतके मतदान झाले. मतदानानंतर दुपारी 3 वाजता मतमोजणाला सुऊवात झाली. काही वेळातच निकाल जाहीर झाले. यामध्ये अध्यक्ष पदासाठी राहुल शिंदे यांनी 151 मते घेऊन विरोधी उमेदवार विनायक लुगडे (89 मते) व अंकुश रानमाळे (59 मते)यांचा पराभव केला. उपाध्यक्षपदासाठी राणी शिरसाट यांनी 156 मते घेऊन मनिषा नाईक (130 मते) यांच्यावर विजय मिळविला. तसेच कोषाध्यक्षपदासाठी गुरुप्रसाद जाधव यांनी 164 मते घेऊन बाळासाहेब कागलकर (130) यांचा पराभव केला. तर विजयी मिळवला.
निवडणूक प्रक्रियेवेळी सतीश ढेंगे, गणेश बरगे, संदीप पाटील, आदित्य कांबळे, सुनील दळवी, नवनाथ डवरी, उत्तम खापरे-पाटील, राहुल पाटील, मनोहर महाडिक, अजय लुगडे, सचिन सवळेकरी, विद्या शिंदे, जयश्री गजगेश्वर, अर्चना गुळवणी, पुंडलिक नागरगोजे, प्रशांत कोरवी आदी उपस्थित होते.









