ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. कनाल उद्या (1 जुलै) शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून राहुल कनाल यांची ओळख होती. ते मुंबई महापालिकेत स्वीकृत सदस्य होते. महाविकास आघाडीची सत्ता असताना शिर्डी देवस्थान समितीवर ते सदस्य होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कनाल पक्षातील अंतर्गत बाबींवर नाराज होते.
वांद्रे पश्चिम मतदारसंघातील सर्व युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. “दु:ख होतंय !!! हे कोणी केलंय हे चांगलंच माहीत आहे. पण ज्यांनी तुमच्यासाठी काम केलं आहे, त्यांना न ऐकता काढून टाकणं म्हणजे अहंकार आहे. तुम्ही मला हटवू शकलात पण त्या लोकांना नाही ज्यांनी रात्रं-दिवस काम केलंय. चला चांगले आहे की सर्वांना माहिती पडले की अहंकार काय असतो.”
Feeling Sad !!! Very well know who has done this but removing people who have worked for you without a hearing is arrogance and you could remove me but not the people who have worked day and night yet Chalo acha hai sabko pata chale ke Ego Aur arrogance kya hota hai !!! pic.twitter.com/JFlB9uZjUU
— Rrahul Narain Kanal (@Iamrahulkanal) June 30, 2023
या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ठाकरे गट सोडत असल्याचे देखील जाहीर केले आहे. कनाल उद्याच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. राज्याच्या उत्तुंग विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे कनाल यांनी म्हटले आहे.








