नदीम मकानदार उत्कृष्ट खेळाडू, शैतन इम्पॅक्ट ख्sाळाडू, उत्कृष्ट गोलरक्षक सुहास, उत्कृष्ट संघ मझर युनायटेड
बेळगाव : के. रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित राहुल के. रत्नाकर शेट्टी चषक बाद पद्धतीच्या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फास्ट फॉरवर्डने बुफा एफसीचा 2-0 असा पराभव करुन राहुल के. रत्नाकर शेट्टी चषकावर आपले नाव कोरले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू व अंतिम सामन्यातील सामनावीर नदीम मकानदार, इम्पॅक्ट खेळाडू शैतन यांना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पोर्टींग प्लॅनेट टर्फ फुटबॉल मैदानावर आयोजित स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे ऑल इंडिया फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष व कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आमदार एन. ए. हॅरिस, अमान शेठ, अशपाक गोरी, इम्रान फतेखान यांच्या हस्ते दोन्ही संघांच्या खेळाडूंची ओळख करून व चषकाचे अनावरण करुन अंतिम सामन्याचे उद्घाटन केले. अंतिम सामना बुफा एफसी विरुद्ध फास्ट फॉरवर्ड यांच्यात झाला. या सामन्यात चौथ्या मिनिटाला बुफाच्या निवृत्ती पवनोजीने मारलेला वेगवान फटका फास्ट फॉरवर्डच्या सुहासने उत्कृष्ट अडविला. 11 व्या मिनिटाला बुफाच्या नदीम इनामदारने गोल करण्याची सुवर्ण संधी वाया घालवली. 17 व्या मिनिटाला फास्ट फॉरवर्डला नदीम मकानदारने वेगवान फटका गोलमुखात मारला होता. पण बुफाचा गोलरक्षक सोहम ओऊळकरने आपल्या डाविकडे झुकत उत्कृष्टपणे अडविला. 28 व्या मिनिटाला प्रद्युम हेगडेच्या पासवर नदीम मकानदारने मारलेला वेगवान फटका गोलरक्षक सोहम ओऊळकरच्या हाताला लागून चेंडू गोलमुखात शिरला व फास्ट फॉरवर्डने 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली.
दुसऱ्या सत्रात 37 व्या मिनिटाला बुफाच्या अभिषेक चेरेकरने गोल करण्याची संधी वाया घालवली. 43 व्या मिनिटाला नदीम मकानदारने वेगवान फटका गोलमुखात मारला. बुफाचा गोलरक्षक सोहम ओऊळकरने चेंडू अडवला पण त्याचा फायदा उठवित डी मध्ये समोर असलेल्या कौनेन होसमनीने फायदा उठवत चेंडू गोलमुखात मारला. 2-0 ची महत्त्वाची आघाडी फास्ट फॉरवर्डला मिळवून दिली. त्यानंतर बुफाच्या निवृत्ती पवनोजी, नजीम इनामदार व अभिषेक चेरेकर यांनी गोल करण्याच्या संधी दवडल्याने त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे चेतन कोठारी, राहुल मगदूम, प्रसन्ना शेट्टी, पुनित शेट्टी, प्रणय शेट्टी, शाबाज देसाई व अक्षय, सलिम फनिवत यांच्या हस्ते विजेत्या फास्ट फॉरवर्ड व उपविजेत्या बुफा संघांना आकर्षक चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट डिफेंडर इजलान (फास्ट फॉरवर्ड), उत्कृष्ट फॉरवर्ड निवृत्ती पवनोजी (बुफा), उत्कृष्ट गोलरक्षक सुहास (फास्ट फॉरवर्ड), स्पर्धेतील सर्वाधिक गोल वशी (बुफा), उत्कृष्ट मीडफिल्डर प्रद्युम (फास्ट फॉरवर्ड), उगवता खेळाडू सैतम (बुफा), उत्कृष्ट संघ मझर युनायटेड, अंतिम सामन्यातील इम्पॅक्ट खेळाडू सैतम (बुफा) तर अंतिम सामन्यातील सामनावीर व स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू नदीम मकानदार यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून इम्रान बेपारी, विष्णू दावणेकर, कृष्णा मुचंडी व ओमकार शिंदोळकर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शेट्टी फौंडेशनच्या पदाधिकारी व स्पोर्टींग प्लॅनेटच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









