बेळगाव :
भुतरामहट्टी (ता. बेळगाव) येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील भृंगा नामक सिंहाला सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री यांच्या 63 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दत्तक घेण्यात आले आहे. मंत्री जारकीहोळी यांचे सुपुत्र व प्रदेश काँग्रेस युवा शाखा मुख्य सचिव राहुल जारकीहोळी यांनी 2 लाख ऊपये देऊन 1 जून 2025 ते 31 मे 2026 या एक वर्षासाठी सिंह दत्तक घेतला आहे. विभागीय वन अधिकारी पवन कुरनिंग यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे. चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी भृंगा सिंहाला नागरिकांनी पाहण्यासाठी मागील महिन्यात मुक्त केले होते.









