महिलांसोबत चिरली भाजी : उष्टी भांडी केली स्वच्छ
वृत्तसंस्था/ अमृतसर
काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी पुन्हा एकदा सुवर्णमंदिरात पोहोचले. तेथे त्यांनी सर्वप्रथम लंगर घरमध्ये महिलांसोबत भाजी चिरली आणि उष्टी भांडी स्वच्छ केली. त्यानंतर त्यांनी हॉलमध्ये अन्नवाटपाच्या कार्यात भाग घेतला. यापूर्वी राहुल यांनी सोमवारी रात्री उशिरा 12 वाजेपर्यंत सेवा केली होती.
राहुल गांधी हे सोमवारी दुपारी सुवर्णमंदिरात पोहोचले होते. तेथे त्यांनी उष्टी भांडी स्वच्छ करत सेवेत भाग घेतला होता. तसेच सुवर्णमंदिरात जात नमन केले होते. राहुल हे सोमवारी रात्री पुन्हा सुवर्णमंदिरात पोहोचले होते आणि त्यांनी परिक्रमेत छबील येथे दीर्घकाळ सेवा केली होती. यादरम्यान भाविक स्वत:हून त्यांच्यानजीक जात संवाद साधत होते. राहुल यांनी सुवर्णमंदिरात सेवा करताना पाहून अनेक जण चकित झाले.









