ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मानहानीच्या खटल्यात गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधींची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. तसेच सूरत न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्दच राहणार आहे. त्याचबरोबर त्यांना सुनवाण्यात आलेली दोन वर्षांची शिक्षाही कायम राहणार आहे.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी ‘मोदी चोर है’ या शब्दांचा वापर केला होता. राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात भाजप नेते पुर्णेश मोदी यांनी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणात राहुल गांधी यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. राहुल गांधी यांनी या प्रकरणात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही पुनर्विचार याचिका आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी 8 वर्षांसाठी रद्दच राहणार आहे. तसेच न्यायालयाने सुनावलेली 2 वर्षांची शिक्षाही कायम राहणार आहे.
राहुल गांधी यांच्या विरोधात किमान 10 खटले विचाराधीन आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वंशजांनी सुद्धा एक तक्रार दाखल केली. कनिष्ठ न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्याची काहीच गरज वाटत नाही. त्यामुळे, राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.