आज पँगाँग लेकला भेट देणार : पुढील पाच दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभाग
वृत्तसंस्था/ लडाख
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या लेह-लडाखच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी आपले काही फोटो शेअर केले असून त्यात ते पूर्ण स्वॅगसह बाईक चालवताना दिसत आहेत. ते आपल्या दौऱ्यात पूर्व लडाखमधील पँगाँग लेकवर पोहोचणार आहेत. पँगाँग लेक त्यांचे वडील राजीव गांधी यांना खूप आवडायचा. त्यामुळेच 20 ऑगस्ट ह्या राजीव गांधी यांच्या जयंती दिनी राहुल गांधी पँगाँग लेक येथे जाऊन आपल्या वडिलांची जयंती साजरी करणार असल्याचे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे. शनिवारची रात्र ते पर्यटन निवासामध्ये घालवणार आहेत.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच लडाखला गेले आहेत. भारत जोडो दौऱ्यात त्यांनी जम्मू आणि श्रीनगरला भेट दिली. या वर्षाच्या सुऊवातीला ते गुलमर्गला खासगी दौऱ्यावर गेले होते पण तरीही लडाखला जाता आले नव्हते.
राहुल गांधी यांनी लडाख दौऱ्यात लेहमधील सुमारे 500 तऊणांशी संवाद साधला. त्यांनी खचाखच भरलेल्या सभागृहात 40 मिनिटे तऊणांशी अनेक मुद्यांवर चर्चा केली. दोन दिवसांच्या दौऱ्यावर ते गुऊवारी लेहला पोहोचले पण आता ते 25 ऑगस्टपर्यंत लेह-लडाखच्या दौऱ्यावर असतील. यादरम्यान ते कारगिल स्मारकालाही भेट देणार असून तेथे ते तऊणांशी संवाद साधतील. लेहमध्ये फुटबॉल सामना पाहण्याचाही त्यांचा बेत आहे. 25 ऑगस्ट रोजी 30 सदस्यीय लडाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिल-कारगिल निवडणुकीच्या बैठकीतही राहुल गांधी सहभागी होणार आहेत. या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने भाजपविरोधात आघाडी केली आहे. 10 सप्टेंबर रोजी परिषदेच्या निवडणुका होणार आहेत.