नवी दिल्ली
काँग्रेस खासदार राहुल गांधी हे पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये युरोपच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राहुल गांधी हे पॅरिसच्या दौऱ्यादरम्यान तेथील विद्यापीठात विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. तसेच राहुल गांधी हे बेल्जियममध्ये युरोपीय आयोगाच्या खासदारांची भेट घेऊ शकतात. राहुल गांधी यांचे यापूर्वीच अमेरिका अन् ब्रिटन दौरे काहीसे वादग्रस्त ठरले होते. तेथे त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता.









