Rahul Gandhi : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Minister Smriti Irani) यांनी राहुल गांधींवर आरोप करत पंतप्रधान मोदींबद्दलचा (PM narendra Modi) द्वेष देशाच्या द्वेषात बदलला असल्याचे म्हटले होते. स्मृती इराणींच्य़ा या आरोपांना प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे ( Mallikarjun Kharge ) यांनी राहूल गांधींवरिल आरोपांना ते स्वत: उत्तर देतील असे म्हटले आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधीं यांनी ब्रिटनमधील विद्यापीठामध्ये केलेल्या विधानांमुळे राहूल गांधी यांनी परदेशी भूमीवर भारताचा “अपमान” केल्याचा आरोप भाजपने केला. तसेच राहुल गांधींनी या बाबत माफी मागावी, अशी मागणी करत राजकीय वातावरण तापवले. बुधवारी राहुल गांधी भारतात पोहोचल्यावर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कधीही देशाच्या गौरवाला धक्का लावला नसल्याचे सांगून पंतप्रधान मोदींवर टीका करणे म्हणजे देशावर टीका करण्यासारखे नाही, असा टोला काँग्रेसने लगावला.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधींवर टीका केली आणि राहुल गांधींचा पंतप्रधानांबद्दलचा द्वेष आता देशाच्या द्वेषामध्ये परिवर्तित झाला आहे. त्यामुळे परकीय शक्ती भारतावर हल्ला का करत नाहीत, अशी खंत राहुल गांधींनी असल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला.
यावर कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, “राहुल गांधी केवळ लोकशाहीबद्दल बोलत असल्याने माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. राहुलजी फक्त लोकशाहीबद्दल बोलले आणि लोकशाहीत लोक वादविवादात करतात, त्यांचे मत व्यक्त करतात त्यामुळे हा मुद्दा अप्रासंगिक आहे.” असे ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









