खराब हवामानामुळे गुरुवारचे नियोजन रद्द
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी गुरुवारी गुजरातमधील जुनागडला भेट देणार होते, परंतु दिल्लीतील खराब हवामानामुळे त्यांचे विमान रद्द करण्यात आले. आता ते शुक्रवारी दुपारी जुनागडला पोहोचतील. या दौऱ्यादरम्यान ते पक्षाच्या जिल्हा आणि शहरातील नेत्यांशी चर्चा करतील. जुनागडमध्ये शहर आणि जिल्हा काँग्रेस नेत्यांसाठी प्रशिक्षण शिबिर सुरू असून तेथे राहुल गांधी मार्गदर्शन करतील. राहुल गांधी यांच्यासोबत संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, अजय माकन आणि इतर नेते देखील उपस्थित राहतील. राहुल गांधी दुपारी 1 वाजता केशोड विमानतळावर पोहोचून रस्तामार्गाने जुनागडला जातील. दुपारी 2 वाजता ते भवनाथच्या पायथ्याशी असलेल्या प्रेरणाधाम प्रशिक्षण शिबिरात पोहोचतील. तेथे ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी रात्री 8 वाजता दिल्लीला परततील.









