नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची शुक्रवारी होणारी चौकशी ईडीने पुढे ढकलली आहे. सोनिया गांधी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे राहुल गांधी यांनीच ईडीला शुक्रवारऐवजी सोमवारी चौकशी करण्याचे आवाहन केले होते. तपास यंत्रणेने त्यांची विनंती मान्य केली आहे. आतापर्यंत ईडीने राहुल गांधींची 3 दिवसांत 30 तास चौकशी केली आहे. गुरुवारी विश्रांती घेतल्यानंतर एजन्सीने त्यांना शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले होते. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांनी गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाला पत्र लिहून चौकशीसाठी सोमवारी आमंत्रित करण्याची विनंती केली होती. चौकशी लांबणीवर टाकण्यामागे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वधेरा हे दोघेही सोनिया गांधींसोबत हॉस्पिटलमध्ये असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.









