ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पोहचली आहे. पदयात्रेदरम्यान सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्यामुळे बनिहाल येथे राहुल गांधी यांनी स्वत:पुरती ही पदयात्रा थांबवली आहे.
राहुल गांधी याबाबत बोलताना म्हणाले, अनंतनाग जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून, पदयात्रेत सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस आम्हाला कुठेच दिसत नाहीत. माझे सुरक्षारक्षक आणि सहकारी चालताना अस्वस्थ झाले. या कारणास्तव मी ही पदयात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, माझे सहकारी ही यात्रा पुढे घेऊन जात आहेत.
अधिक वाचा : प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे; मनुस्मृतीवरील विधानाचा बानवकुळेंनी घेतला समाचार
दरम्यान, जम्मू-काश्मीर काँग्रेसच्या प्रभारी रजनी पाटील यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला सुरक्षा पुरवण्यात जम्मू-काश्मीर प्रशासन अपयशी ठरलं आहे. यातून सुरक्षेबाबत प्रशासनाची अयोग्य वृत्ती दिसून येते. राहुल गांधी आज 11 किलोमीटर चालणार होते, पण केवळ 500 मीटर चालल्यानंतर त्यांना सुरक्षेअभावी थांबावं लागलं.”









