काँग्रेस नेते राहूल गांधी यांना सुप्रिम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला असून गुजरात हायकोर्टाने त्यांना दिलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयाने राहूल गांधींची खासदारकी रद्द होऊन ते परत लोकसभेत दिसण्य़ाची शक्यता निर्माण झाले आहे. हा निर्णय देताना सार्वजनिक जिवनात वावरताना भान ठेऊन वक्तव्य केली पाहीजेत असेही सुप्रिम कोर्टाने राहूल गांधी यांना सुनावले आहे.
सुप्रीम कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू केली होती. राहूल गांधी यांनी एका प्रचारसभेत “मोदी आडनावा”बद्दल केलेल्या विधानावरून त्यांना आपल्या खासदारकीला मुकावे लागेललं आहे. त्यावर राहूल गांधी यांनी सुप्रिम कोर्टात गुजरात न्यायालयाविरुद्ध आव्हान दिले होते.
राहूल गांधींच्या या याचिकेवर आज सुनावणी झाली असून राहूल गांधींना 2 वर्षाच्या शिक्षेपासून संरक्षण मिळाले आहे. यावेळी हायकोर्टाने राहूल गांधींना दोनच वर्षाची शिक्षा कशी काय झाली ? त्यानंतर हायकोर्टाने इतके दिवस हा निर्णय का राखून ठेवला ? दोन वर्षापेक्षा 1 दिवस जरी शिक्षा कमी झाली असती तरी त्यांची खासदारकी रद्द झाली नसती. तसेच दोन वर्षाची शिक्षा मिळून राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा हेतुपूरस्सर हा निर्णय दिला गेला आहे का ? असाही सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे.