लोकसभा सचिवालयाने सोमवारी राहूल गांधी यांचे निलंबन मागे घेतल्यानंतर काही वेळातच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज संसदेत आपली उपस्थिती दर्शविली आहे. नविन स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय विकास समावेशक आघाडी (I.N.D.I.A.) आघाडीच्या नेत्यांकडून त्यांचे संसदेत स्वागत करताना ‘राहुल गांधी जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. संसद भवनात पोहोचल्यानंतर त्यानंतर कॉग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह राहूल गांधींनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
राहूल गांधीची खासदारकी परत मिळाल्यावर त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर आपला ‘डिसक्वालिफाईड खासदार अशा आशयाचा बायो बदलून ‘संसद सदस्य’ असे अद्ययान्वित केले. राहूल गांधी यांच्या संसदेतील आगमनाने संसदेबाहेर काँग्रेस नेत्यांनी मिठाई वाटप केली.
‘मोदी’ आडनावावर केलेल्या टिप्पणी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने राहूल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यांच्या या शिक्षेमुळे त्यांचे संसदपद धोक्यात येऊन संसद सचिवालयाने त्यांच्यावर संसद सदस्यत्व अपात्रतेची कारवाई केली होती.
गुजरात उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात राहूल गांधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून या निकाला विरोधात न्याय मागितला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठाने यावर सुनावणी करून आपल्या खालील न्यायालयांना चांगलेच झापून राहूल गांधी यांची शिक्षा हि हेतुपूरस्सर असल्याचा म्हणून फटकारले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची एक प्रत, औपचारिकपणे लोकसभा सचिवालयाकडे सुपूर्द करण्यात आली असून 8 ऑगस्टपासून सुरू होणार्या मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावामध्ये ते सहभागी होण्याची शक्यता आहे.