ऑनलाईन टीम/तरुण भारत
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर (Swantryaveer Savarkar) यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यावरून राहुल गांधींना निषेध केला जात आहे. महाराष्ट्रात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज 11 वा दिवस आहे. दुपारी एक वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. राहुल गांधी म्हणाले, ‘माझ्याकडे सावरकरजींचे पत्र आहे जे त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याला लिहिले होते, ते मी वाचले. त्यांनी लिहिलं आहे- सर, मला तुमचा सेवक व्हायचं आहे. तुम्ही हे वाचा. बघूया. फडणवीस यांना हवे असल्यास ते पाहू शकतात. मोहन भागवत यांनाही दाखवा. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली हे स्पष्ट आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. याचा पुरावाच आज त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केला. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, माझ्या हातातील कागदपत्र फार महत्त्वाचं आहे. यामध्ये सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेले पत्र आहे. ते संपूर्ण पत्र तुम्हीही वाचू शकता. पण मी शेवटची ओळ वाचून दाखवेन. सर, मी तुमचा नोकर होऊ इच्छितो, असं सावरकरांनी यात म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसांना हे पत्र पाहायचं असेल तर त्यांनीही ते पाहावं. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती. असं राहुल गांधी म्हणाले.
हे ही वाचा : राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी सहमत नाही; भाजपने स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रश्न विचारण्याचं धाडस करु नये- उद्धव ठाकरे
‘गांधी, नेहरू, पटेल झुकले नाहीत, सावरकरांनी माफी मागितली आणि ब्रिटिशांकडून पेन्शनघेत राहिले’ पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, ‘या पत्रावर सावरकरजींनी सही केली होती. गांधीजी, नेहरूजी आणि पटेलजीही तुरुंगात होते, त्यांनी या पत्रावर कोणीही सही केली नव्हती, असेही ते म्हणाले.
ठाकरेंच्या या भूमिकेबाबत पत्रकारांनी राहुल गांधींना सांगितले असता, त्यांनी सावरकरांनी इंग्रजांना लिहेलेल पत्रच वाचून दाखवले. आता, पुन्हा यावरून वाद ओढावण्याची शक्यता आहे.