► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी 31 मे रोजी दहा दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 4 जून रोजी ते मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे पाच हजार अनिवासी भारतीयांना संबोधित करतील. याशिवाय, वॉशिंग्टन आणि पॅलिफोर्नियामध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातही ते भाषण करणार आहेत. या दौऱ्यात ते अमेरिकेतील राजकारणी आणि उद्योजकांचीही भेट घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी लंडन दौऱ्यावर गेलेले राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात केंद्र सरकार आणि भारतीय लोकशाहीवर टीका केल्याने चर्चेत आले होते. दरम्यान, पंतप्रधान मोदी 22 जून रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका भेटीमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये डिनरचेही आयोजन केले आहे.









