बोस्टन :
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर पोहोचले आहेत. अमेरिकेतील बोस्टन लोगान आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ‘आयओसी’चे अध्यक्ष सॅम पित्रोदाही उपस्थित होते. अमेरिकेच्या दौयादरम्यान 21 आणि 22 एप्रिल रोजी राहुल गांधी रोड आयलंडमधील ब्राउन विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करतील. तसेच प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी स्वतंत्र संवादही साधतील. तसेच या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी एनआरआय समुदायाच्या सदस्यांना, अधिकाऱ्यांना आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेस (आयओसी) च्या सदस्यांनाही भेटणार आहेत.









