सर्वोच्च न्यायालयात न्याय जिवंत असून न्याय मेलेला नाही. राहुल गांधींची खासदारकी ठरवून रद्द करण्यात आली होती. काही न्यायमूर्ती अजूनही रामशास्त्री बाण्याचे असल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. मोदी आडनाव मानहानी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णायाविरोधान कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी सुप्रिम कोर्टात दाखल केलेल्या याचिवर आज सुनावणी झाली. या सुनावणीत सुप्रिम कोर्टाने राहूल गांधी यांना दिलासा देत त्यांच्य़ा शिक्षेला स्थगिती दिली. त्यामुळे त्यांची रद्द झालेल्या खासदारकी पुन्हा पुनर्स्थापित होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर संजय राऊत यांनी आपले मत मांडले.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात अजूनही न्याय जिवंत आहे….न्याय मेलेला नाही…देशात काही न्यायमूर्ती रामशास्त्री बाण्याचे आहेत….राहुल गांधींना कोणत्या कारणासाठी शिक्षा ठोठावण्यात आली होती? हे अजूनही कळत नाही…आमच्यावरही असंख्य मानहानीचे खटले आहेत,” असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “गुजरातमधील कोर्ट आणि उच्च न्यायालयांचा संविधान आणि घटनेशी काडीमात्र संबंध राहिला नाही. राहुल गांधींची खासदारकी ठरवून रद्द करण्यात आली होती हे आता सिद्ध झाले आहे. गेल्या दोन वर्षात राहुल गांधींकडून सातत्याने केंद्रसरकारवर टिका करण्यात आली. ‘भारत जोडो’च्या माध्यमातून त्यांनी देशाचं वातावरण ढवळून काढलं आहे. २०२४ साली राहुल गांधी आपली सत्ता उलथवतील म्हणून, उच्च न्यायालयाला हाताशी धरून राहुल गांधींना शिक्षा सुनावली गेली. पण, सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,” असं संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त केले.








