2019 च्या पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरात न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून दोन वर्षांची तुरुंगवसाची शिक्षा सुनावली आहे. राहूल गांधी यांना जामीनावर सोडण्यात आले असले तरी ते या निकालावर अपील करण्याची शक्यता आहे. राहूल गांधी यांनी ‘सर्व चोरांची आडनाव मोदी आहे’ अशी टिप्पणी केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यात राहूल गांधी यांच्याकडून ही टिप्पणी करण्यात आली होती.
कर्नाटच्या कोलार येथे कॉंग्रेसच्या सभेत जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावर भष्य केले होते. यावेळी बोलताना ‘देशातील सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे?’ असा प्रश्न गांधींनी विचारला होता. राहूल गांधींनी केलेल्या विधानावर गुजरातमध्ये त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल होता. गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार तथा माजी मंत्री पुरनेश मोदी (Punresh Modi) यांनी राहुल गांधींविरोधात हा खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी गेल्या आठवड्यात पुर्ण झाल्यावर आज न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
राहून गांधी यांना मानहानी करण्याच्या भारतीय दंड संहितेच्या कलम 500 अंतर्गत दोषी ठरविण्यात आले असून दोन वर्षाचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने जरी ही शिक्षा ठोठावली असली तरी त्यांना जामीनावर सोडण्यात आले आहे. राहूल या निकालावर अपील करू शकतात