काँग्रेस दाखवणार ताकद ः मोर्चाद्वारे नोंदवणार निषेध
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नॅशनल हेराल्ड प्रकरणात हजर राहण्यासाठी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. राहुल गांधी सोमवारी ईडीसमोर चौकशीसाठी हजर होणार आहेत. याप्रकरणी रविवारी काँग्रेसच्यावतीने ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेण्यात आल्या. काँग्रेसने सोमवारी दिल्लीत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणातही ईडीने राहुल गांधींना समन्स बजावले आहे. त्यांना सोमवार, 13 जून रोजी एजन्सीसमोर हजर राहायचे आहे. राहुल गांधी पक्षातील बडय़ा नेत्यांसोबत ईडी कार्यालयाकडे कूच करणार आहेत. काँग्रेसने सोमवारी सकाळी व्हर्च्युअल बैठक घेऊन काँग्रेस वर्किंग कमिटी, प्रदेश सरचिटणीस, लोकसभा आणि राज्यातील खासदारांना दिल्लीत उपस्थित राहण्यास सांगितले आहे. काँग्रेसचे सर्व वरि÷ नेते राहुल गांधींसोबत पायी चालत ईडी कार्यालयाकडे कूच करण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसच्या या रणनितीच्या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाही रविवारपासूनच कडक सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात आली आहे. राहुल गांधी वगळता अन्य कोणालाही ईडी कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.









