मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald Case) ईडीकडून आज चौथ्या दिवशीही चौकशी केली जात आहे. ईडीच्या या चौकशीला काँग्रेसकडून जोरदार विरोध होत असून, देशभरात कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दरम्यान आज काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील हँगिंग गार्डने ते राजभवनावर मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, मंत्री अस्लम शेख, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड सहभागी झाले आहेत. यांच्या उपस्थितीत राजभवनाला घेराव घालण्यात आला आहे. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
हेही वाचा- विधानपरिषदेला गाफील राहणार नाही- सतेज पाटील
पटोले म्हणाले की, केंद्रात बसलेल्या आंधळ्या, बहिऱ्या सरकारला जागं करण्यासाठी आजचा मोर्चा असून, हा जनतेचा आवाज आहे.गेल्या तीन दिवसांपासून राहुल गांधींची ईडीकडून सुमारे दहा-दहा तास चौकशी केली जात आहे. ज्या पद्धतीने ही कारवाई केली जात आहे. त्या विरोधातील हे आंदोलन आहे. काँग्रेसच्या नेत्यांवर अशाच पद्धतीने कारवाई होत राहिल्यास येत्या काळात तीव्र आंदोलनं थेडण्याचा इशारा दिला. पुढे बोलताना ते म्हणाले, . आतापर्यंतच्या आंदोलनात पोलिसांना सहकार्य केलं आहे. पण ये तो अभी झाँकी है और बहोत बाकी है असा टोला हाणत भाजपावर निशाणा साधला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








