वृत्तसंस्था / सोनीपत
हरियाणात राहुल गांधी यांनी शेतीकामातही सहभाग घेऊन एका शेतात ट्रॅक्टर चालविला आहे. तसेच त्यांनी भातपेरणीही केली. गाव मदीना येथे त्यांनी शेतकऱ्यांकाडून शेतीकामाची माहिती घेतली. गावातील नागरीकांनी त्यांची भेट घेतली. बरोदा मतदारसंघातील काँग्रेस आमदार इंदुराज नरवाल आणि गोहाना येथील आमदार जगबीरसिंग मलिक यांनीही या कामात राहुल गांधी यांच्यासह भाग घेतला. वास्तविक राहुल गांधी दिल्लीहून सिमल्याला जाण्यासाठी निघाले होते. मात्र, वाटेत अचानक कार्यक्रम बदलून त्यांनी हरियाणातील शेतीकाम पाहण्याचा निर्णय घेतला. नंतर ते शेतात पोहचले. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चाही केली.









