वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. याप्रसंगी लालूंच्या दरबारात ‘शेफ’ बनत त्यांनी सर्वांना धक्का दिला. या भेटीचे आणि जेवण बनवतानाचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. राहुल गांधींनी लालूप्रसाद यादव यांच्यासोबतच्या मुलाखतीचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये दोन्ही नेते ‘राजकीय मसाल्यां’वर चर्चा करताना दिसत आहेत. तसेच दोन्ही नेते मटण बनवत असल्याचे एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. दिल्लीतील राज्यसभा सदस्य आणि लालूप्रसाद यांची कन्या मीसा भारती यांच्या निवासस्थानी राहुल गांधी यांनी लालूंची भेट घेतली.









