Nana Patole : राहुल गांधी यांना सूरत कोर्टाकडून 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा दोषमुक्त करण्याची याचिका राहुल गांधी यांनी दाखल केली होता, मात्र आज सूरत कोर्टानं राहुल गांधींची याचिका फेटाळली. यासंदर्भात काँग्रेस उद्या हाय कोर्टात याचिका दाखल करणार आहे. सूरत कोर्टाच्या सुनावणीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे होण अपेक्षित होतं, अशी प्रतिक्रिया एका खासगी वृत्तवाहिनीला दिली. त्यानिमित्ताने आम्हाला हाय कोर्टात जाण्याची संधी आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, आम्हाला न्याय मिळणार अशी अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, कर्नाटकातील 2019 चं वक्तव्य सुरतमध्ये आणणे आणि त्यावर निर्णय देणं हे ठरवल्यासारखं होतं. कर्नाटकच्या निवडणूकी दरम्यान असा कोर्टाचा येणे याचा नेमका काय परिणाम होईल असा प्रश्न पटोलेंना विचारल्यावर ते म्हणाले की, याच्यात आमची काही चूक नाही, हे सर्वांना माहित आहे. देशात सध्या हुकूमशाही सुरु आहे हे जनतेला माहित आहे. कर्नाटकाची जनता जागृत असल्याचेही ते म्हणाले.
सूरत कोर्टात याचिका दाखल करताना काँग्रेसचे सर्वच नेते उपस्थित होते यामुळे शक्तीप्रदर्शन करत असल्याचे दिसलं आता हायकोर्टात याचिका दाखल करताना हेच चित्र दिसणार का असा देखील प्रश्न विचारताच पटोले म्हणाले, ते शक्तीप्रदर्शन नव्हतं. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. संपूर्ण देश त्यांच्या पाठिशी आहे हे आम्हाला दाखवायचं होत. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळणार अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








