वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा व दिल्ली कॅपिटल्स संघाचा फलंदाज केएल राहुल व त्याची पत्नी अभिनेत्री आथिया शेट्टी यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. यासाठी सोमवारी लखनौविरुद्ध झालेल्या सामन्यात राहुल सहभागी झाला नव्हता.
या खास क्षणांवेळी सोबत राहण्यासाठी राहुलने दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझींची परवानगी घेतली आणि रविवारीच तो मुंबईत दाखल झाला होता. आथियाने कन्यालाभ झाल्याचे वृत्त इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केल्यानंतर दोघांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले. सोमवारच्या सामन्यात नाणेफेक झाली, त्यावेळी दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने राहुलच्या अनुपस्थितीबाबत काहीच माहिती दिली नाही. पण नंतर त्याबाबत माहिती समजली. 30 मार्च रोजी दिल्लीचा सामना सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणार असून या सामन्यात राहुल खेळणार आहे. चाहते त्याच्या दिल्ली संघातील पदार्पणाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत.









