वृत्तसंस्था / बेंगळूर
भारताचा माजी कर्णधार आणि प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रवीड तसेच त्याचा मुलगा अनवे यांनी नासूर स्मृती चषक थर्ड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेतील गट एकमधील सामन्यात शनिवारी विजय क्रिकेट क्लब मालूरकडून खेळ केला.
या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला राहुल द्रवीड 8 चेंडूत 1 चौकारांसह 10 धावांवर बाद झाला. पण त्याचा मुलगा अनवेने या सामन्यात 60 चेंडूत 8 चौकारांसह 58 धावा झळकविल्या. विजय क्रिकेट क्लबने 7 बाद 345 धावा जमविल्या. हा सामना विजय क्रिकेट क्लब आणि यंग लायन्स क्लब यांच्यात खेळविला गेला होता. विजय क्रिकेट क्लबच्या स्वप्नीलने शानदार शतक झळकविले. त्याने 50 चेंडूत 4 षटकार आणि 12 चौकारांसह 107 धावा जमविल्या.









