वृत्तसंस्था/ मुंबई
आगामी होणाऱ्या 2023 च्या क्रिकेट हंगामातील सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेसाठी मुंबई संघाची घोषणा करण्यात आली असून अजिंक्य रहाणेकडे संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले असून अष्टपैलू मुलानीकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
सदर स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान पाच विविध शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. गेल्या वर्षी मुंबई संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना अंतिम सामन्यात हिमाचल प्रदेशचा तीन गड्यांनी पराभव केला होता.
मुंबई संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मुलानी (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रघुवंशी, सर्फराज खान, शिवम दुबे, प्रसाद पवार, हार्दिक तेमोरे, तनुष कोटीयान, अथर्व अंकोलेकर, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्ती, रॉयस्टन डायस, अजित यादव, साईराज पाटील.









