ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
भारताची अल्पसंख्यांकविरोधी छबीमुळे भारतातील स्वदेशी उद्योगांना याचा फटका बसू शकतो. भारतात वाढलेल्या सामाजिक हिंसाचारावर रिजर्व बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी चिंता व्यक्त केली. एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची एक दंगेखोर देश ही प्रतिमा झाल्यास भारताच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळणार नाही. तसेच भारत एक आपली विश्वासर्हता गमावून बसेल अशी भिती व्यक्त केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की लोकशाहीमध्ये देशातील सर्व नागरिकांबरोबर समान व्यवहार केला जातो. विदेशात कुठल्याही देशात उत्पादन विकले जाण्यासाठी त्या देशाची प्रतिमा कशी आहे हे महत्वाचे ठरते. कारण देश जर चांगली कामगिरी करत असेल तर त्याच्या उत्पादनांना बाजारपेठेत मोठी मागणी असते.