उदयपूर :
आम आदमी पार्टीचे (आप) खासदार राघव चढ्ढा रविवारी एका दिमाखदार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रासोबत उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये विवाहबंधनात अडकले. निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह हे उपस्थित होते. विवाह सोहळ्याची छायाचित्रे सोमवारी व्हायरल झाली असून नवदाम्पत्य आता राजधानी दिल्लीला पोहोचले आहे. दिल्लीतील स्वागत सोहळ्यावेळी नवदाम्पत्य भारतीय पेहरावात दिसत होते.









