मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी दिली माहिती
प्रतिनिधी / पणजी
मुल्यवर्धन शिक्षणामुळे विद्यार्थी तसेच शिक्षकांमध्ये चांगला बदल झाला आहे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. गोव्यातील सुमारे 500 हुन अधिक शाळातील विद्यार्थ्यांनी निसर्गाचे महत्व कथीत करणारे पोस्टर रंगवून शांतीलाल मुत्ता फाऊंडेशनकडे पाठविले आहे. सुमारे 200 शिक्षकांनी मत व्यक्त करणारे लेख पाठविले आहे. तसेच 150 व्हिडीओ क्लीपींग पाठविले आहे. एकूणच मुल्यवर्धनमुळे शिक्षणात आमुलाग्रह बदल होत असल्याचे दिसून येत आहे असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
शांतीलाल मुत्ता फाऊंडेशन व गोवा सरकार यांच्या संयुक्तविद्यामाने येथील पर्यटन भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत शांतीलाल मुत्ता फाऊंडेशनचे शांतीलाल मुत्ता, शिक्षण संचांलक शैलेश झींगडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शांतीलाल मुत्ता यांचा सरकारच्या वतीने शाल व पुष्प गुच्च देऊन सन्मान केला. 2018-19 या शैक्षणिक वर्षात मुल्यवर्धन शिक्षणाबाबत प्रभावी मुल्यनिर्धारण केले असता अनेक सकारात्मक गोष्टी समोर आल्या आहेत. असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
शांतीलाल मुत्त फाऊंडेशन तयार केलेल्या प्रकल्पा नुसार 26 जुलै 2016 सालापासून गोव्यात मुल्यवर्धन शिक्षणाची अमंलबजावणी करण्यात आली होती. गोव्यातील सरकारी शाळा, विद्याभारती तसेच इतर खाजगी मिळून सुमारे 700 शाळांनी पहिली ते चौथी पर्यंत मुल्यवर्धन शिक्षणाची अंमल बजावणी केली होती. 22 हजार विद्यार्थी तसेच 1 हजार 700 शिक्षकांना याचा फायदा झाला आहे. असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
मुल्यवर्धन शिक्षणामुळे विद्यार्थ्यामुळे अमुलाग्र असा बदल झालेला दिसून येत आहे. 81 टक्के वर्गात विद्यार्थी शिक्षणात व्यस्त असलेले दिसून येत आहे तर 50 टक्के विद्यार्थी स्वतःहून शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत. 93.8 टक्के विद्यार्थी वाईट किंवा चुकीच्या गोष्टी कशा टाळाव्यात ते शिकले आहेत. तर 92.50 टक्के विद्यार्थी सार्वजमिक सुविधांचा जबाबदारीने वापर करण्यास शिकले आहेत.
विद्यार्थ्यांना मुल्य शिकविली जात नसून ती मुलामध्ये रुजविणे गरजेचे आहे. म्हणून मुल्यवर्धन शिक्षणाची गरज आहे. गोवा सरकारने हा उपक्रम राबविला असून त्याचा चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले आहे. आत्ता पर्यंत पहिली ते चौवथी पर्यंत मुल्यवर्धन शिक्षण सुरु होते आता पाचवी ते आठवी पर्यंत मुल्यवर्धन शिक्षणाची सुरुवात करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शाळा बंद करणार नाहीः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
गोव्यातील एकही शाळा बंद केली जाणार नाही. असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्याचे नुकसान होणार असे कोणतेही काम केले जाणार नाही. किंबहुना विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा मिळाव्या या साठी विद्यार्थ्यांना एकत्रीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे करण्यात अगोदर पालक तसेच शिक्षकांना विश्वासात घेतले जाईल असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांनी सांगितले.
अनेक शाळातून खास शिकवणी वर्ग सुरु झाले असून या विद्यार्थ्यांनाही माध्यन आहार सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. साधरणतः ऑक्टोबर महिन्यापासून हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.









