अभिनेत्री राधिका आपटे तिच्या अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाते, राधिकाने इंडस्ट्रीमध्ये स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. तिचा परफॉर्मन्स असो किंवा तिचं बोल्ड स्टेटमेंट असो, राधिकाचा स्वतःचा प्रेक्षकवर्ग आहे.राधिकाचा ‘पार्च्ड’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिने आपल्या इंस्टाग्रामवरून याच चित्रपटातील एक लूक शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तसेच यावर कमेंट चा वर्षाव झाला आहे. दरम्यान, एका सोशल मीडिया वापरकर्त्याने तिची तुलना क्रिकेटर कृणाल पंड्याशी केली आणि ‘ती कुणाल पंड्यासारखी दिसते’ अशी टिप्पणी लिहिली आहे.
लहान केस, धुकेदार डोळे आणि घाणेरडे कपड्यांमध्ये राधिका पूर्णपणे अनोळखी दिसत होती.या फोटोवर तिचा मित्र आणि अभिनेता विजय वर्माने ‘सेक्सी डाकू’ असे लिहिले आहे, तर चित्रपट निर्मात्या लीना यादवने ‘ग्लोरियस टाईम्स’ लिहिलेआहे.तर आणखी एकाने तुम्ही हार्दिक पांड्याचा फोटो का पोस्ट केला आहे ?’ अशी कमेंट केली आहे. अशाप्रकारे राधिकाच्या फोटोवर काहींनी प्रशंसा केली आहे तर काहींनी टिप्पणी केली आहे. पण राधिका सध्या तिच्या अभिनय कौशल्याने चाहत्यांना पुन्हा एकदा प्रभावित करण्यासाठी सज्ज झाली आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









