वृत्तसंस्था / गुरुग्राम
हरियाणातील प्रसिद्ध युट्यूबर राधिका यादव हिच्या हत्याप्रकरणाचा तपास पूर्ण झाला असल्याची घोषणा हरियाणा पोलिसांनी केली आहे. हे एक स्पष्ट प्रकरण आहे. तिची हत्या तिच्या पित्यानेच गोळ्या झाडून केली याचे स्वच्छ पुरावे आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचे अधिक अन्वेषण करण्याची आवश्यकता नाही. आता तिच्या पित्याविरोधात न्यायलयात अभियोग चालविला जाईल. राधिका यादव हिच्या मैत्रिणीच्या व्हिडीओंचा तपास करण्याचे कारण नाही. म्हणून अन्वेषण पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात येत आहे, अशी माहिती हरियाणा पोलीसांनी दिली आहे.
राधिका यादव हिचा पिता दीपक यादव याने तिच्या हत्येची योजना हत्येपूर्वी तीन दिवस केली होती. तसेच त्यांच्यातील मतभेद विकोपाला गेल्याने त्याने तिची हत्या केली असावी, असे मत तिची 10 वर्षांपूर्वीपासूनची मैत्रिण हिमांशिका सिंग हिने मंगळवारी तिचे काही व्हिडीओ पोस्ट करुन व्यक्त केले होते. तथापि, पोलिसांनी या व्हिडीओंकडे लक्ष देण्याचे कारण नाही, असे स्पष्ट केले आहे.









