दिनेश विजन यांच्याकडून चित्रपटाची घोषणा
स्त्राr, मिमी आणि बदलापूर यासारखे अनेक हिट चित्रपट निर्माण करणारे दिनेश विजन यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांच्या मॅडॉक प्रॉडक्शन कंपनीने स्वतःचा आगामी चित्रपट ‘हॅप्पी टीचर्स डे’ची घोषणा केली असून यात राधिका मदान आणि निमरत कौर दिसून येणार आहे.
चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला असून यात निमरत कौर आणि राधिका मदान यांची झलक दिसून आलेली नसली तरीही याची कहाणी शिक्षकाच्या अवतीभोवती घुटमळणारी असल्याचे स्पष्ट होते. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून याचे चित्रिकरण सध्या सुरू आहे.

राधिका मदान यापूर्वी मॅडॉक प्रॉडक्शन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटात दिसून आली आहे. चित्रपटात तिने इरफान खान यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. परंतु आता निमरत कौर आणि राधिका मदान ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसून येणार आहे. या चित्रपटात त्यांचे नायक म्हणून कोण झळकणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.









