इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राधिका मदानची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘सना’ दाखविला जाणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुधांशु सरिया यांनी केले आहे. हा चित्रपट महोत्सव 11-20 ऑगस्टदरम्यान मेलबर्न येथे आयोजित होणार आहे. यापूर्वी शांघाय इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, टालीन ब्लॅक नाइट फिल्म फेस्टिव्हल आणि सांता बार्बरा फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे.

सना चित्रपट आयएफएफएमद्वारे पूर्ण जगापर्यंत पोहोचणार आहे. मेलबर्नमधील प्रेक्षकांना भेटण्यासाठी आम्ही आतुर आहोत, असे दिग्दर्शन सरिया यांनी म्हटले आहे. या चित्रपटात एका महिलेच्या मनात सुरू असलेल्या उलथापालथीचा तिच्या वैयक्तिक आयुष्यावर पडणाऱ्या प्रभावाची कहाणी दर्शविण्यात आली आहे. सना दु:खातून सावरू न शकल्याने तिला दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येईल. यात राधिका सोबत सोहम शाह, शिखा तलसानिया आणि पूजा भट्ट हे कलाकार आहेत.









