वार्ताहर/मजगाव
दसरा स्पोर्ट्स म्हैसूर कुस्ती स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या वर्षी राधिका बस्तवाडकर ही सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. सीएम कप 2025 कुस्ती स्पर्धा म्हैसूर येथे दि. 22 ते 28 सप्टेंबरमध्ये झालेल्या 50 किलो गटात सुवर्णपदक मिळवित राधिकाने यश संपादन केले. तसेच 17 वर्षांखालील 49 किलो गटात प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदकाची मानकरी ठरली. सध्या ती हल्याळ येथील डीवायएम स्पोर्ट्स हॉस्टेल येथे सराव करीत आहे. प्रशिक्षक तुकाराम गौडा, शिवानंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. खादरवाडी येथील महेश सुतार, पिंटू नाईक, राजू पिंगट, राजू मजुकर, दीपक पाटील यांचे तिला प्रोत्साहन लाभत आहे.









