एकाच छताखाली सर्व सुविधा रूग्णांना मिळणार, मेडिकल स्टोअर मंजूर, स्वतंत्र ऑपरेशन थिएटरमध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया
राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी ग्रामीण रुग्णालयात लवकरच स्वतंत्र प्रसूती विभाग सुरू होणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ, गणपती गवळी यांनी दिली,” लक्ष” योजनेअंतर्गत रुग्णालयात प्रसूतीगृहासाठी स्वतंत्र इमारत उभारणीचे काम सुरू असून या ठिकाणी अद्यावत ऑपरेशन थिएटर उभारण्यात येत असून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत, यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा लाभ होणार आहे.
सध्या या रुग्णालयात प्रसुती विभाग आहे, तालुक्यातून प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलाची संख्या व खाटाच्या मर्यादित संख्या आदी कारणाने होणारी गैरसोय दूर होणार आहे, नवीन इमारतीत अंतर्गत कामे पूर्ण झाल्यानंतर प्रसुती विभाग वापरासाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
तसेच रुग्णालयासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध होणार असून या ठिकाणी सर्व प्रकारच्या रक्तचाचणी ही होणार आहे, याच बरोबर सोनोग्राफी, सीआर्म, हाडांच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, महालॅब, पोस्टमार्टम,मेडिकल स्टोअर आदी सुविधा रूग्णांना मिळणार आहेत. या ग्रामीण रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य सेवेमार्फत, लॅपरोस्कोपिक अपेंन्डेक्स, गर्भाशयाच्या पिशवीच्या सर्व शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे, आर्थोपेडिक, सिजर, हर्नियाचे सर्व शस्त्रक्रिया, आदी सर्वसेवा या ग्रामीण रुग्णालयात मोफत उपलब्ध असून याचा तालुक्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहनही डॉ गणपती गवळी, रंजना लोहार(रुग्णालय इनचार्ज), पंढरी खांडेकर (महात्मा फुले जनआरोग्य समन्वय) व संग्राम सोनगेकर यांनी केले आहे,









