राधानगरी / महेश तिरवडे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राधानगरी शहर बंद ठेऊन सकल मराठा समाज, बौद्ध समाज, इतर मागासवर्गीय समाज व मुस्लिम समाज आणि युवा शक्ती संघटना यांच्यावतीने राधानगरी बसस्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढत हजारोंच्या संख्येनं मोर्चाने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले,या मोर्च्याला मराठा समाजसह राधानगरी परिसरातील सर्व सामाज्यान पाठींबा दिला. राधानगरीतील सर्व व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला,

राधानगरी शहरासह परिसरातील सकल मराठा समाज आणि इतर समाज्यातील नागरिकांनी राधानगरी बसस्थानकाजवळ एकत्रित येत भव्य रॅलीचे तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आल्यानंतर मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले.यावेळी मोर्चाचे निमंत्रक राजेंद्र भाटळे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे कायदेशीर मार्गाने मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या माता भगिनी आबालवृद्धांवर पोलीस प्रशासनाने केलेल्या लाठीहल्ल्याचा सूत्रधार कोण? याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली.जोपर्यंत शासन मराठा आरक्षण जाहीर करत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नसल्याचं सांगितले.माजी शिक्षण आणि अर्थ समिती सभापती जगदीश लिंग्रस,जंनतादलाचे शरद पाडळकर,अर्जुन पाटील,प्रा आर डी पाटील, अरविंद पोवार, संजय गोजारे,उमेश शिंदे,विनोद मुसळे,डी एस कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा या घोषणानी तहसीलदार कार्यालयाच्या आवार दुमदुमला होता. यावेळी राधानगरीच्या सरपंच सविता भाटळे, सावित्री गुरव यांच्यासह महिला आंदोलकांच्या हस्ते तहसीलदार अनिता देशमुख यांना निवेदन देण्यात आले.मोर्चाला संबोधीत करताना तहसीलदार अनिता देशमुख यांनी मराठा आरक्षणची मागणी शासन दरबारी पोचवण्याची ग्वाही दिली.
यावेळी आंदोलनाला आर पी आय,गुरव समाज, वंचित बहुजन आघाडी,चर्मकार समाज इतर मागासवर्गीय समाज,मुस्लिम समाज आदी विविध संघटनांनी पाठिंबा दिला.यावेळी तंटामुक्त अध्यक्ष आनंदा पोवार,अरविंद पोवार,संजय कांबळे,रवी भाटळे,जयवंत पताडे,प्रवीण पाटील,गोविंद चौगले,बाजीराव चौगले,प्रकाश डेळेकर,शुभम पाटील, कृतुजा म्हापसेकर, वैशाली किल्लेदार, दया सांगावकर, यांच्यासह मराठा समाजबांधव महिला मोठ्या संख्येनेउपस्थित होते.
दरम्यान या निषेध मोर्च्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली होती, पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी पोलीसानी शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता,









