Radhanagari gate open-कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजाच्या आज पहाटे साडेपाच वाजता उघडला आहे. सात स्वयंचलित दरवाजे पैकी सहा नंबरचा दरवाजा उघडला असून त्यातून 1428 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. राधानगरी धरणातून एकूण 3028 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी असला तरी नदी पातळीत वाढ होणार असून नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Previous Articleविंडीजच्या केरॉन पोलार्डचा आगळा विक्रम
Next Article विविध राज्यांमधून 5 दहशतवाद्यांना अटक









