कोल्हापूर :
गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावासाने शहरासह जिल्ह्यात सोमवारी व मंगळवारी दमदार एंट्री केली आहे. शहरासह जिल्ह्यात बुधवारी पावासाचा जोर ओसरला असला तरी धरण क्षेत्रात जोर कायम आहे. यामुळे धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरण 90 टक्यांवर पोहचले असुन जिल्ह्यातील आठ धरणे 100 टक्के भरली आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत मे व जून महिन्यात यंदा दुप्पट पाऊस झाला आहे. जुलैच्या निम्यावरच जिल्ह्यातील आठ धरणे फुल्ल झाली आहेत. उरर्वरीत सर्वच धरणांचा पाणीसाठा 80 टक्क्याहून अधिक झाला आहे. राधानगरी धरण 90 टक्के भरले असुन धरण क्षेत्रात मुसळाधार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहील्यास येत्या काही दिवसातच राधानगरी धरण 100 टक्के भरेल अशी शक्यता व्यक्त जात आहे. यातून विसर्ग सुरू झाल्यास पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढण्याचा धोका आहे. यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
- कोयणा 73 तर अलमट्टी 79 टक्यांवर
धरण क्षेत्रात पावासाची संततधार सुरूच आहे. कराड येथील कोयणा धरण 73.41 टक्के भरले असुन यातून विसर्ग वाढला आहे. तर अलमट्टी धरण 79.51 टक्यावर आहे. यातूनही विसर्ग सुरू आहे. पावासाचा जोर वाढल्यास धरणांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.
- बुधवारी सकाळची पाणीपातळी
धरणाचे नाव पाणी पातळी सध्याचा पाणीसाठा(टक्के)
कोयणा : 651.688 73.41
अलमट्टी : 518. 02 79.51
हिप्परगी : 620. 47 —
- जिल्ह्यातील धरणसाठा :
धरणाचे नाव सध्याचा पाणीसाठा (ंटक्के) विसर्ग (क्युसेक)
राधानगरी : 90 3100
तुळशी : 80 300
वारणा : 83 4500
दुधगंगा : 73 1500
कासारी : 75 1000
कडवी : 98 240
कुंभी : 77 300
पाटगाव : 93 300
चिकोत्रा : 84 00
चित्री : 100 180
जंगमहट्टी : 100 435
घटप्रभा : 100 5078
जांबरे : 100 843
आंबेओहोळ : 100 141
सर्फनाला : 100 192
धामणी : 100 2803
कोदे : 100 00








