राधानगरी/प्रतिनिधी
राधानगरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आज दिवसभर पावसाचा जोर ओसरला असून, राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा पहाटे बंद झाला.तर रात्री 8 वाजता 7 क्रमाकांचा बंद झाला,पाठोपाठ 8 वाजून 15 व 16 मिनिटाने उर्वरित दोन दरवाजे बंद झाले ,सद्या बी ओ टी पॉवर हाऊस मधून 1400 क्यूसेकने भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.सद्या विसर्ग कमी झाल्याने पडळी आणि पिरळ बंधारे वाहतुकीस खुले झाले आहेत.
पावसाचा जोर कमी झाल्याने खुले असलेले सर्व दरवाजे बंद झाले आहेत,. धरणाचे ,सद्या पाणी पातळी 346.64 फूट, पाणीसाठा 8196.74 दलघफूट एकूण पाऊस 2473 मी मी नोंदला आहे, आज धरण पाणलोट क्षेत्रात दिवसभरात २२ मिलीमीटर इतकाच पाऊस झाला आहे. भोगावती नदीवरील शिरगाव,कसबा तारळे,राशिवडे बुद्रुक, हे बंधारे पाण्याखाली आहेत.