राधानगरी/प्रतिनिधी
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात काल पासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेनं भरले आहे.गुरुवारी सकाळ पासून धरणाचे ३,४,५,६ क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडून, वीजगृहातून असा 7212 क्यूसेक विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे.
धरणाचे सकाळी 10 वाजून 5 मिनिटाने स्वयंचलित द्वार क्रं. ६ उघडले. यातून1428 क्यूसेक तर पॉवर हाऊसमधून 1500 क्यूसेक असा 2928 क्यूसेक विसर्ग सुरू होता. त्यानंतर सकाळी 11 वाजलेपासून ते बारा पर्यत स्वयंचलित दरवाजे क्रं. 3 व 4 चा उघडला असे एकूण चार दरवाजे खुले झाले आहेत.

या सर्व दरवाजांतून 5712 क्यूसेक आणि पॉवर हाऊसमधून 1500 क्यूसेक असा एकूण 7212 क्यूसेक विसर्ग भोगावती नदीत विसर्ग सुरू आहे. संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.








