भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
राधानगरी / महेश तिरवडे
गेल्या चार दिवसांपासून राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात व अभयारण्य क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरण आज दुपारी दोनच्या दरम्यान 90 टक्के भरले आहे. उद्या संध्याकाळ (मंगळवार) पर्यत धरण पूर्ण क्षमतेने भरून कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होऊ शकतात असा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे. सध्या धरणातून 1600 क्यूसेकने भोगावती नदी पात्रात विसर्ग सुरू असून नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
आज सकाळी पाणी पातळी 341-10 फूट, पाणीसाठा 7187-08 दलघनफूट इतका आहे. तर दिवसभरात 150 मी मी इतका पाऊस नोंदला आहे. एकूण पाऊसाची 25.63 मीमी नोंद नोंद झाली आहे. अद्याप धरण भरण्यास 4 ते 5 फूट पाणी कमी असून असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास मंगळवारी सायंकाळ पर्यत धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होऊ शकतात असा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे