राधानगरी / महेश तिरवडे
लोकराज छ,शाहू महाराज यांनी 18 फेब्रुवारी 1908 साली आपली कन्या राधाबाई अक्कासाहेब महाराज यांच्या नावाने पूर्वीचे वळीवडे गावाचे नाव बदलून राधानगरी हे नाव दिले. यास 115 वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने मुख्य बाजरपेठेत असलेल्या छ, शाहू महाराजांनी बांधण्यात आलेल्या अंबाबाई मंदिरानजीक असलेल्या चौकात शहरातील जेष्ठ नागरिक महिपती निंबाळकर ,बापूसाहेब बैलकर व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत छ,शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ध्वज उभारून स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य सरकारने दर्जा दिलेले गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत शालेय विद्यार्थिनिनी गीत गाऊन झेंड्याला मानवंदना दिली.
यावेळी शाहू प्रतिष्ठानचे संभाजी आरडे, सतीश फणसे, बबन पालकर, रमेश पोवार, संतोष तायशेटे, महेश मोरये, दीपक शिरगावकर, महेश निल्ले, दत्तात्रय पोतदार, मारुती पारकर, दत्तात्रय परीट, धनाजी पाटील, रमण पाटील, विलास रणदिवे यांच्यासह शहरातील नागरिक व शाहूप्रेमी जनता उपस्थित होती.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









