तर व्हाईस चेअरमनपदी गोविंद मुळीक
न्हावेली / वार्ताहर
श्री राधाकृष्ण सहकारी दूध व्यावसायिक संस्था मळेवाड चेअरमनपदी अर्जुन जयद्रथ मुळीक, व्हाईस चेअरमनपदी गोविंद रघुनाथ मुळीक तर सचिवपदी गोपाळ खेमा नाईक यांची निवड करण्यात आली आहे .मळेवाड येथील श्री राधाकृष्ण सहकारी व्यावसायिक दूध संस्थेचा कार्यकाल संपल्याने नवीन कार्यकारिणी संचालक मंडळ निवडण्यात आले. संस्थेच्या कार्यालयात निवडणूक अधिकारी म्हणून सहकार अधिकारी एस एस धुमाळ यांच्या उपस्थितीत पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडली . यावेळी उपस्थित संचालक मंडळातून अर्जुन जयद्रथ मुळीक यांची चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमन गोविंद रघुनाथ मुळीक यांची बिनविरोध निवड करण्यात आली . तर सचिवपदी गोपाळ खेमा नाईक यांची निवड करण्यात आली . मावळते चेअरमन सतीश सातार्डेकर यांनी नवनिर्वाचित चेअरमन चेअरमन , व्हाईस चेअरमन,सचिव, संचालक मंडळ यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या .
यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना नवनिर्वाचित चेअरमन मुळीक यांनी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन गावातील दूध संकलन वाढवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून या दूध संस्थेचा विकास व प्रगती होण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे असे आश्वासित केले . नवीन संचालक मंडळामध्ये संचालक म्हणून सतीश सातार्डेकर,प्रसाद नाईक,सुरेश नाईक,प्रज्ञा नाईक, सुषमा नाईक, प्रकाश पार्सेकर, एकनाथ गावडे,यांचा समावेश आहे . नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीवेळी मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत उपसरपंच हेमंत मराठे उपस्थित होते . त्यांनीही नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या .