Delhi Mayor Election : दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत (Delhi Corporation Election) भाजपच्या (BJP) 15 वर्षांच्या राजवटीला सुरूंग लावून आम आदमी पार्टीने (AAP) जबरदस्त विजय मिळवला होता. त्यानंतर आज महापालिकेच्या महापौर पदासाठी निवडणक होणार होती. महापालिकेच्या सभागृहात आज अभुतपुर्व दृष्य़ पहायला मिळाले. या सेभेत नगरसेवकांनी डेस्क आणि व्यासपीठावर चढण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी केल्याचे पहायला मिळाले. काही सद्स्यांनी धक्काबुक्की आणि खुर्च्या फेकल्याने या निवडणुकीला हिंसक वळण लागले. त्यामुळे मतदान होण्यापूर्वीच सभा तहकूब करण्यात आली.
AAP ने दिल्ली विद्यापीठाच्या माजी प्राध्यापिका शेली ओबेरॉय ( Shelbi Oberoi ) यांना महापौरपदाचे आणि मोहम्मद इक्बाल (Mohammad Iqbal) यांना उपमहापौरपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले. तर भाजपने या पदांसाठी अनुक्रमे रेखा गुप्ता (Rakha Gupta) आणि कमल बागरी (Kamal Bagari) यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांच्या १० भाजप सदस्यांना एल्डरमेन म्हणून नामनिर्देशित करण्याच्या निर्णयावर ‘आप’ने नाराजी व्यक्त केली आणि वाद वाढत गेला. पण सभागृहात दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ घातला. आपने भाजपवर ‘गुंडगिरी’चा आरोप केला तर भाजपने ‘आप’च्या नेत्यांनी गोंधळ सुरू केला असा आरोप केला. त्यानंतर काही वेळातच अनागोंदी माजल्याने मार्शलना गोष्टींवर नियंत्रण ठेवून सभागृह तहकूब करावे लागले.
Previous Article‘आज मैं मूड बना लिया ए ‘,अमृता फडणवीसांचा गाण्यातून नवा अंदाज
Next Article जळगावात वर्षभरात 196 शेतकऱ्यांच्या आत्महत्या









