ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते आज दुपारी डोंबवली येथील शिवसेनेच्या कार्यालयात घुसले. तिथे त्यांनी बळजबरीने एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे फोटो लावण्याचा प्रयत्न केला. यावरुन सेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात राडा झाला. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. तरीही शिंदे गटाने कार्यालयात शिंदेंचा फोटो लावण्याचा आपला प्रयत्न यशस्वी केला.
शिवसेनेच्या या मध्यवर्ती शाखेत बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचाही फोटो होता. मात्र, एकनाथ शिंदेंचा फोटो काही दिवसांपूर्वी हटविण्यात आला होता. त्यामुळे शिंदे गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आज शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी या शाखेत घुसून बळजबरीने त्याठिकाणी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा फोटो लावला. या सगळय़ा प्रकारामुळे डोंबिवलीच्या मध्यवर्ती शाखेत शिवसैनिक आणि शिंदे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. या सर्व गोंधळात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अखेर एकनाथ शिंदेंचा फोटो लावला.
शिवसेनेविरुद्ध बंड करुन एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून राज्यातल्या राजकारणाला नवं वळण मिळालं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे डोंबिवलीही शिवसैनिकांमध्ये उभी फूट पडली आहे. त्यांच्यात काही दिवसांपासून वाद झालेले आहेत. यातच दोन्ही गटात आता शिवसेना नोंदणीवरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा वादात?; नामांतरावरुन ‘त्या’ उद्यानाचं उद्घाटन रद्द









