लगान चित्रपटातील अभिनेत्री
आमिर खानचा चित्रपट ‘लगान’मध्ये एलिझाबेथ ही भूमिका साकारणारी ब्रिटिश अभिनेत्री रेचल शेली लवकरच नेटफ्लिक्सची वेबसीरिज्ा़ ‘कोहरा’मध्ये दिसून येणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शक रणदीप झा यांनी केले असून सीरिज 15 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. कोहरा या सीरिजची कहाणी पंजाबमधील एक कुटुंबावर आधारित आहे. या सीरिजमध्ये अभिनेता वरुण सोबती, सविंदर विक्की, वरुण बडोला, हरलीन सेठी दिसून येणार आहेत.

विवाहसोहळ्यापूर्वी एका घरात एनआरआय व्यक्तीचा मृतदेह मिळाल्यावर कुटुंबाच्या जीवनात येणाऱ्या वादळावर ही सीरिज बेतलेली आहे. याची कहाणी सुदीप शर्मा, गुंजित चोप्रा आणि डिग्गी सिसोदिया यांनी लिहिली आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रेचलची या सीरिजकरता निवड करण्याचा निर्णय योग्य ठरला आहे. सीरिजमध्ये आम्हाला ब्रिटिश कलाकाराची गरज होती. वेबसीरिजची चित्रिकरण करणे चित्रपटांच्या चित्रिकरणापेक्षा वेगळे असते. रेचलला भारतीय वातावरण नवखे नसल्याने तिने यात उत्तम काम केल्याचे दिग्दर्शकाने म्हटले आहे.









