मुंबई
बुधवारी शेअरबाजारात घसरणीचा माहोल असताना साखर कंपन्यांनी तेजीची दौड राखण्याचा प्रयत्न केला आहे. बुधवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान अनेक साखर कंपन्यांचे समभाग 7 टक्केपेक्षा अधिक तेजीत होते. बलरामपूर चीनी मिल्स, त्रिवेणी इंजिनियरिंग अँड इंडस्ट्रिज, धामपूर शुगर मिल्स, द्वारकीश शुगर इंडस्टिज, अवध शुगर, श्री रेणुका शुगर्स आणि मगध शुगर अँड एनर्जी यांचे समभाग 3 ते 7 टक्के या प्रमाणात बाजारात तेजी राखून होते.









